दिनांक 08/09/2020 रोजी रात्री 01.30 वा. धारावी पोलीस ठाण्याचे गुंडा पथकास गुप्त माहिती प्राप्त झाली की, पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला जाणार आहे. त्या अनुषंगाने सपोनि अमोल चव्हाण व पो शि क्र 080966/ राजेश चंदनशिवे यांनी राजीव गांधी नगर झोपडपट्टी ओएनजीसी गेट, धारावी याठिकाणी सापळा रचून चार इसमांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या पिशव्या व गोण्या यामध्ये काय आहे? असे विचारणा केली असता त्यांनी नमूद गोणी व पिशव्यांमध्ये गांजा असल्याचे सांगितले. सदर बाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश बाबुराव नांगरे साहेब व पोनी कैलास विठ्ठल बोंद्रे साहेब यांना माहिती दिली असता पोनी बोन्द्रे यांनी सपोनि पाटील, पोउनि येवले व पथक यांना मदतीकरिता पाठविले. वर नमूद मुद्देमाल हा पंचनामा अंतर्गत व इसमांना ताब्यात घेऊन हस्तगत गांजाचे वजन केले असता एकूण वजन 27 किलो असल्याचे निदर्शनास आले. नमूद 27 किलो गांजा ची किंमत सध्या बाजारामध्ये 5,32,600/- रुपये इतकी आहे. नमूद आरोपी यांनी गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या बाळगला म्हणून पोलीस ठाण्यात विशेष स्थानिक गुन्हा नोंद क्रमांक 92/20 कलम 8 क, 20 क, 29 NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई ही माननीय व.पो.नि रमेश बाबुराव नागरे सो, पो नि श्री कैलास विठ्ठल बोन्द्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
प्रतिनिधी – उमेश मुरकर, पंचनामा गुन्हेगारीचा