पावसाच्या जोरदार आगमनात मुंबापुरीची झाली तुंबापुरी ! मुंबईत अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले.

मुंबई : आजपासून म्हणजेच, ९ जून ते १३ जून दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे.  मुंबईकरांची मॉन्सूनच्या पहिल्याच पावसामुळे त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईची सालबादप्रमाणे यंदाही तुंबापुरी झाली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणेही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेही ठप्प झाली आहे. पाणी रेल्वे रुळावर आल्यामुळे मध्य आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे.  माटुंगा किंगसर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्या मुळे सायन वरून दादर व त्यापुढे जाणारी वाहतूक सायन येथेच थांबवण्यात आली होती, मुंबईमध्ये आज मॉन्सूनची एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पण मॉन्सूनने मुंबईत प्रवेश केला की, नाही, हे जरी जाहीर झालेले नसले तरी मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले आहे. हा पाऊस अद्यापही मुंबईच्या अनेक भागांत बरसत आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरे म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस होत आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाच्या विजा व गडगडाटासह  जोरदार सरीही कोसळत आहेत. असे असले तरी मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com