मुंबई : तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत, धारावीतील मुकुंद नगर येथे मनीष मेडिकल जवळ झाड कोसळले, त्यावेळी नगर सेवक वसंत नकाशे, गणेश थेवर, राजेंद्र सूर्यवंशी, किरण काळे, सिद्धार्थ कासारे, सतीश सोनावणे यांनी जातीने उपस्थित राहून रस्त्यावरील झाड तोडून रस्ता मोकळा करून दिला, तसेच सायन लक्ष्मी बाग, सेनाभवन, दादर, लालबाग, भायखळा, इथेही रस्त्यावर झाडे पडलेली होती, अरबी समुद्रात उठलेले तौक्ते नावाचे चक्रीवादळ आज मुंबई लागत दाखल झाले; आणि मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत ठिकाणी वादळी वारे वाहू लागले. सोबतच वेगाने पडनारा पाऊस मुंबईकरांना धडकी भरवून लागला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबई शहरासह उपनगरातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढले होते. वाऱ्याचा वेग आणि पाऊस वाढत असतानाच मुंबई महापालिकेने मुंबईकर नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. शिवाय वादळी वारे वाहत असल्याने झाडाखाली उभे राहू नका, असे आवाहन देखील मुंबई महापालिकेकडून नागरिकांना सातत्याने करण्यात येत होते