मुंबई – इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबईच्या धारावीतील घराबाहेर जोरदार आंदोलन केले. तोडफोडीचे या आंदोलनाला गालबोट लागले असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला आहे.
धारावीत दहावी, बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांचा जमाव कसा झाला? त्यांना नेमके कुणी बोलावले होते? याची माहिती विद्यार्थ्यांना विचारण्यात आली असता ‘हिंदुस्थानी भाऊ’चे नाव अनेकांनी घेतले आहे. धारावीतील आंदोलनात ‘हिंदुस्थानी भाऊ’ देखील सहभागी झाला होता, याचा व्हिडिओ त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवर देखील पाहायला मिळत आहे.