मुंबई : ऑनलाइन शिक्षण पद्धतीत कोणीही वंचित राहू नये यासाठी धारावी काळा किल्ला मनपा शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना आज टॅबलेट्स वितरित करण्यात आले.
आय ए यच व्ही या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. या वेळी आदित्य ठाकरे पर्यावरण पर्यटक मंत्री खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, किरण दिघावकर, बी एम सी चे शिक्षणाधिकारी राजू तडवी, उत्तर विभागाच्या प्रशासकीय अधिकारी स्नेहलता डुंबरे व आय ए यच व्ही च्या प्रमुख मीरा गुप्ता उपस्थित होत्या.
कोरोनाची परिस्थिती किती दिवस चालेल माहीत नाही. पण त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. यापूर्वी शाळेत शिकण्यासाठी टॅब दिले होते, परंतु आता ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब देण्यात येत आहेत. हा बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी नवनवीन शिक्षणपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
