चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्यावर अन्याय करणारा जीआर सरकारने 11 डिसेंबर 2020 रोजी जारी केला आहे. त्या विरोधात शिक्षक भारतीने आज राज्यभर आंदोलन केलं. ठिकठिकाणी शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक / जिल्हाधिकारी यांना शिक्षक भारतीच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले.
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीने आकृतीबंध निश्चित न करता शिक्षण विभागाने 11 डिसेंबर 2020 ला ठोक मानधनावर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील तरतुदींशी विसंगत आहे. उपरोक्त कायदा किंवा किमान वेतन कायद्यात अद्यापी विधिमंडळाने बदल केले नसल्याने अशाप्रकारे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमणे अन्यायकारक व बेकायदेशीर आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा हा बेकायदेशीर जीआर रद्द करा यासाठी शिक्षक भारतीने हे आंदोलन केल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
शिक्षकेतर कर्मचारी यांचं घंटानाद –
आमदार कपिल पाटील यांनी आज शिक्षकेतर कर्मचारी यांना या जीआर विरोधात शाळा, कॉलेजमध्ये घंटानाद करण्याचं आवाहन केलं होतं. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिक्षकेतर कर्मचारी यांनी घंटानाद केलं. या अन्यायकारक जीआर विरोधात आपला निषेध नोंदवला, अशीही माहिती मोरे यांनी दिली.
सरकार इतका मोठा अन्याय कसा करू शकतं?
– कपिल पाटील
चतुर्थश्रेणी कर्मचारी ( शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामठी, तेलवाला, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर इत्यादी) हे गरीब, बहुजन, मागासवर्गीय आणि अल्पसंख्य वर्गातूनयेतात. त्यांचा रोजगार हिरावून घेण्यात आला आहे.फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार यांच्या नावाने राज्य करणारं सरकार इतका मोठा अन्याय कसा करू शकतं? असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी यानिमित्ताने विचारला आहे.
शिक्षक भारतीचा संघर्ष सुरूच राहणार
– अशोक बेलसरे
11 डिसेंबर 2020 चा बेकायदेशीर व शिक्षणाचे कंत्राटीकरण करणारा अन्यायकारक शासन निर्णय रद्द होईपर्यंत शिक्षक भारती संघर्ष करत राहणार आहे. शिक्षकेतर कर्मचारी हा शाळेचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही, असं शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी सांगितलं.
18 डिसेंबरच्या बंदला पाठिंबा-
11 डिसेंबर 2020 चा शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर अन्याय करणाऱ्या या जीआर विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांनी शाळा, महाविद्यालय 18 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या बंदला आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचा पाठींबा आहे, अशी माहितीही बेलसरे यांनी दिली आहे.

राज्यभर कुठे कुठे आंदोलन झालं?
1) मुंबईत उत्तर विभागात शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे, रुपेश नकाशे, मछिंद्र खरात, वसंत उंबरे, कौलाश गुंजाळ, राजेंद्र तवटे, प्रमोदिनी दवंडे, शोभा कडलक, शामल तुपे, संजय वलेकर, निलेश कांबळे, प्रकाश राठोड, तानाजी सुळे, सुजाता मोहिते, जाधव सर, इब्राहिम सर, महारनवर सर, शिक्षककेतर कर्मचारी यांचे नेते प्रवीण वाढवणे, रमाकांत मोरे, बाळू सरगर यांनी शिक्षण निरीक्षक, उत्तर विभाग यांना निवेदन दिले.
2) मुंबईत दक्षिण विभागात शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, मुंबई प्रमुख कार्यवाह शिवाजी खैरमोडे, दक्षिण विभाग अध्यक्ष राधिका महांकाळ, सुनील कदम, आनंदा पाटील, डॉरीस फ़र्नांडीस, रवी कांबळे, रामदास केरकर यांनी शिक्षण निरीक्षक, दक्षिण विभाग यांना निवेदन दिले.
3) मुंबईत शिक्षक भारतीचे पश्चिम विभागात अध्यक्ष अमोल गंगावणे, संदीप घार्गे, जालिंदर दळवी, मंगेश पवार, विलास रहाटे, संपदा जोशी, किशोर पटेल, चंद्रकांत टंकसाळी, आशा पाटील, अशोक धादवाड, शिक्षकेतर कर्मचारी अंकुश जाधव यांनी शिक्षण निरीक्षक, पश्चिम विभाग यांना निवेदन दिले.
4) सिंधुदुर्ग येथे जिल्हा शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, जिल्हा सचिव सुरेश चौकेकर, संजय नाईक, महेश भाट, संजय पेंडूरकर, सुरेंद्र लांबोरे, शिक्षकेतर जिल्हा सचिव जगदीश सावंत, प्रशांत पालव, पांडुरंग दळवी यांनी शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन दिले.
5) अहमदनगर येथे शिक्षक भारतीचे सचिव सुनिल घाडगे, उर्दू विभाग अध्यक्ष मोहम्मद समी, मुजीब शेख यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
6) मालेगाव येथे शिक्षक भारतीचे मालेगाव महानगर प्रमुख सुधीर पाटील, रशीद पठाण, चंद्रशेखर शेलार, रईस शेख आणि पदाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
7) जळगाव येथे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ आणि सोमनाथ पाटील दीपक आर्डे, आर. के. पाटील, संजय साळुंखे, अजयकुमार पाटील, पंकज गरुड, संदीप पाटील, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे रवींद्र पाटील, मनोज पाटील यांनी शिक्षणाधिकारी जळगाव यांना निवेदन दिले.
8) साक्री येथे तहसिलदार यांना शिक्षक भारतीचे संघटक अश्फाक खाटीक, आबासाहेब पाटील, जयवंत पाटील, लालाजी नांद्रे, पी झेड कुंवर, संजय काकुलदे यांनी निवेदन दिले.
9) अकोले येथे गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, सचिव सुदर्शन ढगे, संजय पवार, संदीप महाडदेव, योगेश उगले, रोहिदास चव्हाण, इकबाल सय्यद यांनी निवेदन दिले.
10) कोल्हापूर येथे शिक्षक भारतीचे पुणे विभाग अध्यक्ष दादा लाड, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे, सचिव अनिल चव्हाण यांनी शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन दिले.
11) शिक्षक भारती ठाणे आणि शहापूर तालुका यांच्यावतीने तहसिलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांना एकनाथ तारमाळे, रवींद्र पालवी, प्रकाश भांगरथ, सुरेश विशे, सुरेश भाकरे, राजेश विशे, बाजीराव भोईर, विष्णू ठोंबरे, संतोष निचिते, वाळू पोटे, बाळाराम दांडकर, अनिल निचिते, रवींद्र विशे, शरद मोडूंळे यांनी निवेदन दिले.
12) नाशिक येथे शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना शिक्षक भारतीचे नाशिक विभाग अध्यक्ष राजेंद्र लोंढ, प्रशांत पवार, दादा निकम, वैभव वाघ, विजय रौदळ यांनी निवेदन दिले.
13) नंदुरबार येथे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष महेश नांद्रे, कार्याध्यक्ष आशिष दातीर, राजेश जाधव, पुष्कर सूर्यवंशी, चेतना पाटील, मनोज पाटील, विवेक भोई यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
14) चंद्रपूर येथे शिक्षक भारतीचे नागपूर विभाग सरचिटणीस सुरेश डांगे, जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख, सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, पुरषोत्तम टोंगे, राकेश पायताडे, संजय बोबाटे यांनी शिक्षणाधिकारी चंद्रपूर माध्यमिक आणि प्राथमिक, चंद्रपूर जि.प. अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते यांना निवेदन दिले.
15) खेड येथे गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षक भारतीचे कोकण विभाग अध्यक्ष धनाजी पाटील, शिक्षक भारती खेडचे संदीप पाटील, पोपटराव जगताप, संजू सोनावणे, विजयकुमार माळी, सुभाष ढाकणे, श्रीकांत देवळेकर, शिक्षकेतर संघटनेचे राजेंद्र शिंदे आणि पदाधिकारी यांनी निवेदन दिले.
16) अमरावती येथे शिक्षक भारतीचे अमरावती विभाग अध्यक्ष दिलीप निंभोरकर, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र इंगळे, मंगेश खेरडे आणि पदाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
17) नागपूर येथे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, नागपूर विभाग अध्यक्ष भाऊराव पत्रे, कार्यवाह सपन नेहरोत्रा, राज्य संयुक्त कार्यवाह दिलीप तडस, जिल्हा अध्यक्ष भारत रेहपाडे आणि पदाधिकारी यांनी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
18) चिपळूण येथे शिक्षक भारती जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष जाधव, तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे, भाऊ कांबळे, लक्ष्मण गावित, महेश राऊत, अरुण शिवगण, शिक्षकेतर कर्मचारी विलास चिपळूणकर यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
19) राजापूर येथे पंचायत समिती शिक्षण विभाग अधीक्षक यांना शिक्षक भारतीचे संजय पाथरे, सुनील जाधव, सुनील कोंडकर, पुंडलिक वाजंत्री, बाबालाल फरस यांनी निवेदन दिले.
20) दापोली येथे तालुका विस्तार अधिकारी यांना शिक्षक भारतीचे मुबीन बामणे, बाबासाहेब रुपन्नवार, रियाज म्हैसाळे, जुबेर मुल्ला, असिफ भाटकर, इब्राहिम कुमनाळी, यासिन नांदगावकर, मंदार जोशी, बाळकृष्ण बामणे यांनी निवेदन दिले.
21) संगमेश्वर येथे गटशिक्षणाधिकारी यांना जिल्हा कार्यवाह निलेश कुंभार, भाई शिंदे, प्रकाश पांढरे, दत्तात्रय वाडकर, धनाजी बेंद्रे, रशीद तडवी, मिलिंद कडवईकर, प्रदीप कानाल, भाग्यादेवी चौगुले यांनी निवेदन दिले.
22) गोंदिया येथे शिक्षक भारतीचे व्ही. डी. मेश्राम, पी. एफ. बघेले, डी. एम. टेंभरे, व्ही. टी. पटेल, बी. एम. कोरसकर यांनी निवेदन दिले.
23) तुमसर येथे शिक्षक भारतीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष शेषराव रामटेके, दुधाराम शंभरकर, प्रशांत राऊत, जगदीश मोहोड आणि पदाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
राज्यभर या सगळ्या ठिकाणी शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक काही ठिकाणी जिल्हाधिकारी यांना शिक्षक भारतीच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले, अशी माहिती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली.
खूप छान सर खूप मुद्देसूद लिखाण आहे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला शिक्षक भारती संघटना आंदोलन करते त्याबद्दल तुमचे लिखाण खूप सुंदर आहे मुद्देसूद आहे आणि वैचारिक आहे तळागाळातील लोकांपर्यंत तुमच्या लिखाणामुळे जागृती नक्कीच होईल धन्यवाद सर खूप सुंदर