मुंबई – कोरोनावर मात करुन भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर घरी परतला आहे. सचिनची कोरोना चाचणी 27 मार्चला पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. सचिन तेंडुलकरला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती त्याने ट्विट करत माहिती दिली आहे.
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिनने म्हटले आहे की, दवाखान्यातून आताच घरी आलो आहे. पण सध्या विलगीकरणात राहणार असून विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्याने पुढे म्हटले आहे की, मी सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. ज्यांनी माझी काळजी घेतली. ते खूप कठिण परिस्थितीत आपली सेवा बजावत असल्याचे सचिन म्हणाला.