लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ऑनलाईन मीटिंगद्वारे साधला व्यापारी वर्गाशी संवाद !

मुंबई : शहरात कोरोनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता, पालिका आणि प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात व्यापारी वर्गाच्या समस्या व परिस्थितीचां आढावा घेण्यासाठी मा पोलीस सह आयुक्त (का व सु) अधिकारी, मा अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग अधिकारी यांनी मुंबईतील व्यापारी वर्ग यांचेशी झूम मीटिंग द्वारे दिनांक २७/०४/२१ रोजी दुपारी १२.५० वा संभाषण साधून सर्व व्यापारी वर्गाच्या लॉक डाऊन काळात येत असलेल्या विविध अडचणींवर विचार विनिमय केला, काही व्यापारी प्रतिनिधींनी दुकानदारांना कोणत्या समस्यांना या काळात तोंड द्यावे लागत आहे हे सविस्तर पणे मांडण्यात आले. तर काही व्यापाऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल व हाताळलेल्या कविड जन्य परिस्थितीत केलेल्या चांगल्या कामाबद्दल आभार प्रदर्शन केले. मुंबई शहरातील सर्व पारिमंडळीय पोलोस उप आयुक्त, विभागीय स पो आ व सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ऑनलाईन मीटिंग करिता उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com