प्रतिनिधी/मुंबई .: शाळेतील विद्यार्थी म्हणजे मातीचा गोळा असून या गोळ्याला आकार देणे म्हणजेच विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये, संस्कारित करण्यामध्ये शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी केले दरम्यान, २०१९- २० चे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार ५० आदर्श शिक्षकांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याच्या हस्ते नुकताच भायखळा ( पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोमले उद्यानातील पेंग्विन कक्षात आयोजित समारंभात प्रदान करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ५० पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दहा हजार रोख, प्रमाणपत्र, स्मूरतीचिन्ह तसेच सदिच शाल व श्रीमळ दिऊन महापौर व इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरवण्यात आले. या मिळालेल्या पुरस्कार संदर्भात बोलताना चेंबूर वेल्फेअर मराठी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ श्रद्धा उदय उजाळे यांनी प्रतिक्रिया देताना संस्थेचे अध्यक्ष मा. विठ्ठल खरटमोल साहेब , जनता वेल्फेअर इंग्लिश हायस्कूल च्या सचिव मा . सौ रुख्मिणी खरटमोल मॅडम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गाडे सर , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व पालक वर्ग यांचे आभार मनात, छोटीशी कविताही सादर केली
तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी दुवा आहे।
जगण्याची दवा आहे ।
काळजात जपून ठेवावा असा ठेवा आहे ।
रानातला रानमेवा आहे ।
आपल्या सर्वांचा सहवास नेहमीच हवा आहे ।