“लव्ह यु बाबा” मराठी रंगभूमीवरील एक धाडसी नाट्यप्रयोग.

बाप आणि मुलीच्या नात्याची उकल होणारं एक दमदार नाट्य “लव्ह यु बाबा” या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रसिक प्रेक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
मिलिंद पेडणेकर यांनी लिहिलेले वृध्दाश्रम या सामाजिक विषयावर भाष्य करणारे नाटक आहे. “लव्ह यु बाबा” या नाटकात कोणतेही प्रथितयश कलाकार नाहीत. नात्यकलेचा अनुभव असलेल्या पण मराठी व्यावसायिक नाट्य सृष्टीला नवख्या असणाऱ्या कलावंलतांनी या नाटकात दमदार अगदी सराईतपणे भूमिका करताना एकही कलावंत कुठेही कमी पडला नाही, ही जमेची बाजू. पत्रानुरुप देहबोली, अभिनय काव्य पंक्ती बोलतानचा वाचिक अभिनय या मध्ये तद्दन सराईत व्यावसायिक कलावंतांनी पाठी टाकतील असे सर्वच कलाकार वावर करताना दिसतात.
वृध्दाश्रम आणि तिथली माणसं, त्यांचं दैनंदिन जीवन सुरू असताना एक दिवशी “सायली” नावाचं पात्र साकारणाऱ्या मुलीचे आगमन होते. मानस शास्त्र पदवी शिक्षण घेत असलेल्या सायलीचा, वृद्धाश्रमातील जीवन व त्याचा अभ्यास हा प्रोजेक्ट साकारण्यासाठी ती येते.परंतु तिचं येणं किंवा वृध्दाश्रमांच्या व्यथा मांडण्यासाठी तेथील वृध्द मध्ये दोन गट तयार होतात एक तिच्या बाजूने व एक तिच्या विरोधात. आपलं दुःख सार्वत्रिक होऊ नये ही त्यामागची भावना असते. जस जसे कथानक पुढे जाते तस तसे तिला होणारे विरोध मावळू लागतो. प्रत्येक पात्राचे इथे वृद्धाश्रमात येण्याचे कारण किती वेदनादायी आणि भयावह असते हे जाणल्यावर प्रेक्षक कथानकात समरस होऊ लागतात.”वृध्दाश्रम ही समस्या की काळाची गरज आहे” ते असणे चांगले की वाईट अशी कोणतीही ठाम भूमिका न घेता दोन पिढ्यांमधील जेनरेशन गॅप चे पर्यावसन हे निर्मितीस कारणभूत असल्याचा वास्तववादी आरसा दाखवणारी ही नाट्य संहिता आहे. करियर ओरिएंटेड पिढी ला घरातील वृध्द व्यक्ती, आधार न वाटता, अडगळ वाटू लागते. नाटकाची रंगमंचीय मांडणी अतिशय उत्तम असून नेपथ्यकाराने खराखुरा वृध्दाश्रमच रंगमंचावर उभारल्याची जाणीव प्रेक्षकांना होते. प्रकाश योजनेचा कुठे ही अतीरेक न करता केलेला वापर व त्यामुळे काही प्रसंग अधिक गहिरे झाले आहे. कथानकातील उप कथानक दाखविताना रंगमंचावर उप कथानक, थोडक्यात आणि नेमक्या स्वरूपात दाखवितात आणि पुन्हा आपल्या मूळ भूमिकेत येतात या साठी इथे कल्पक दिग्दर्शक आणि अभिनय संपन्न कलाकारांना दाद द्यावीच लागेल. पार्श्व संगीत आणि पार्श्व गीतातून “लव्ह यु बाबा” हे नाटक हृदय पिळवटून टाकते, कधी बासरीचा, कधी संतूर वादनाचा, तर कधी सारंगी वादनाचा खुबी ने वापर केला आहे.
या नाटकाचा शेवट ही धक्का तंत्राचा अवलंब करून., सुखद आणि आल्हाददाई वाटावा असाच केला आहे. प्रेक्षक प्रेक्षागृह सोडताना नाटकाची कथा कथेचा संदेश याचे पाणावलेल्या डोळ्यांनी चिंतन करीत जातो. एकूणच काय तर या कोरोनाच्या पंडामिक काळात ही प्रेक्षकांना आत्मा चिंतन करायला लावणारे हे नाट्य सामाजिक समस्ये बाबत बराच संदेश देऊन जाते. याचे संपूर्ण श्रेय कथानक इतकेच कलावांत, दिग्दर्शका सह पडद्यामागील संपूर्ण टीम ल जाते. संगम मुव्हीटोन्स ही नाट्य संस्था “सामाजिक पार्श्वभूमी” असलेल्या मुशीत तयार झाल्याने, या निर्मिती संस्थेने कोरोनाच्या भयावह काळातही मराठी रंगभूमी ला “पूनुरुत जीवीत” करण्याच्या हेतूने निर्माण केलेले “लव्ह यु बाबा” हे नाटक संपूर्ण मराठी रसिक प्रेक्षकांनी नाट्यगृहात जाऊन एकदा तरी पाहायला हवे, तरच मराठी रंग भूमिलाल चांगले दिवस येतील. पृथा तानाजी घाग या तरुण निर्माती ने केलेला धाडसी प्रयत्न, एका सामाजिक समस्येचा आरसा सशक्त माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाट्यकलेतून सादर करण्याचे साहस आणि तिला मिळालेली अद्वैत थिएटर ची साथ येत्या काळात व्यावसायिक रंग भूमीवर रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने सामाजिक चळवळ उभी करू शकेल यात दुमत नाही.
प्रतिनिधी-
संगम मुव्हीटोन्स निर्मित, अद्वैत थिएटर प्रकाशित दोन अंकी नाटक व्ह यु बाबा”लेखक/ दिग्दर्शक – मिलिंद पेडणेकर नेपथ्य – प्रदीप पाटील,संगीत – बाबा धुरी प्रकाश योजना – संजय तोडणकर व्यवस्थापक – सुशील आंबेकर सूत्रधार – कोमल तानाजी घाग निर्माती- पृथा तानाजी घाग। प्रवेशानुक्रमे पात्रपरिचय॥व्यास – सुनील व्यास. शिवानी – शिवानी मुरकर.घाग – सुनील सुर्वे. सायली – श्रुती पाटील.सुर्वे – सुगत उथळे. करमरकर – वंदना गानू .मुलगा – योगेश मोरे. सोमण – कविता मानकर.पंकज – पंकज पेडणेकर. सीमा – सीमा वाघमारे.श्रीनाथ देसाई – नितीन जाधव. मातोंडकर – श्रुती तोडणकर सावंत – अभिजित धोत्रे. कुलकर्णी – संजय देशपांडे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com