नगर दि. ७: नगर येथे सुवर्ण प्राइड या हॉटेलमध्ये वाको महाराष्ट्राच्या सर्वसाधारण सभेसाठी जमलेल्या प्रशिक्षक व पंच या सर्वांनी किक बॉक्सिंग खेळाचा प्रचार व प्रसार तसेच किक बॉक्सिंग खेळामधील गुणवंत खेळाडूंसाठी भविष्यात त्यांना या खेळाचा कशा प्रकारे फायदा करून घेता येईल, याबद्दल सविस्तर चर्चा झाली. कारण नगर मधील शहानवाज शेख या खेळाडूने नुकतीच एअरपोर्टच्या सिलेक्शन साठी स्पेशल फॉर्स गरुड कमांडो याची अठरा महिन्यांची खडतर अशी ट्रेनिंग घेऊन तो चांगल्या गुणांनी पास ही झाला. वाको महाराष्ट्राच्या सर्व प्रशिक्षकांनी व सदस्यांनी त्याचे टाळ्या वाजवून शाहनवाज याचे स्वागत केले. व त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाहनवाज याने शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. व महाराष्ट्र बेस्ट फायटर हा टायटल ही त्याला मिळाला आहे. उपस्थित मान्यवरांसमोर शहानवाज याने ट्रेनिंग संदर्भात बोलताना १८ महिन्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी व त्याला ट्रेनिंग दरम्यान कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागले याचे सविस्तर वर्णन जमलेल्या मंडळींना त्याच्याकडून ऐकायला मिळाले. महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी या पुढे महाराष्ट्राच्या असोसिएशन तर्फे मुलांना पारितोषिके व पुरस्कार देण्याचे आश्वासन दिले, जेणेकरून उभरत्या खेळाडूंना चांगले प्रोत्सशन मिळेल. पंचनामा चे वरिष्ठ पत्रकार श्री उमेश मुरकर हेही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. शाहनवाज चा हा प्रवास व त्याचा खेळ विविध ठिकाणच्या स्पर्धा त्यांनी स्वतः पहिल्या आहेत. व या खेळाच्या माध्यमातून शाहनवाज याला देशसेवा करण्याचे भाग्य लाभले त्याबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या
