मुंबई : गेली दोन वर्षे करोना निर्बंधांमध्ये अडकलेला लालबाग परिसरात उत्सवाचं अनोखे स्वरूप पाहायला मिळाले. भक्तांचा ओसंडून वाहणारा जनसागर पाहिल्यावर ‘ही शान कुणाची…’ असं आपसूकच तोंडी येते. मुंबईचा राजाची, अशी ख्याती असलेल्या गणेशगल्लीतील भव्य विश्वकर्मारूपी बावीस फुटी गणेशमूर्तीचे रूपाने सर्व जनसागरास भुरळ पाडली, ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची अशी विविध श्रीगणेशाचा जय-जयकार करणारी गाणी लालबाग मधील मिरवणुकीत जलोषांत वाजत होती,
गणेशगल्लीच्या मंडळाने १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात भारतातील पहिली २२ फूट उंच मूर्ती निर्माण केली व लालबागचे नाव जगविख्यात केले. ‘भव्यतेची परंपरा व संस्कृतीची जोपासना’ हे मंडळाचे ब्रीदवाक्य लालबाग-परळमधील प्रत्येक नव्या-जुन्या मंडळाच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे.