आयएनएस ध्रुव १० सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात

नवी दिल्ली: शत्रूपक्षाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा क्षणार्धात माग काढणारे ‘आयएनएस ध्रुव’ हे जहाज लवकरच भारतीय
नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. शत्रूच्या अण्वस्त्र वाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारे भारताचे पहिले आणि जहाज आहे. १० सप्टेंबरला ते लाँच केले जाईल. हिंदुस्तान शिपयार्डने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या मोठ्या सहकार्यानि निर्मिती केलेल्या आयएनएस ध्रुवमध्ये शत्रूच्या टेहळणी उपग्रह आणि अण्वस्त्रबाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा मागोवा घेण्याची क्षमता आहे. आयएनएस ध्रुवच्या लाँच दरम्यान नौदल प्रमुख अडमिराल ॲडमिरल करमबीर सिंह आणि एनटीआरओचे अध्यक्ष अनिल दासमानासह डीआरडीओ आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे जहाज भारतीय नौदलाच्या जवानांसह स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे (एसएफसी) नियंत्रित केले जाईल. आतापर्यंत अशी जहाजे फक्त , फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, रशिया, आणि चीनने तया केली आहेत. आता या यादीत भारताचा देखील समावेश झाला आहे.

भारताचे सागरी क्षेत्र होणार सुरक्षित
१० हजार टन वजनाचे हे जहाज भारतीय शहरे आणि लष्करी तळाजवळ येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्राबाबत लवकर चेतावणी देणारी यंत्रणा म्हणून काम करेल आणि ते त्या हल्ल्याचा संपूर्ण प्रतिकार करेल. एवढंच नव्हे तर हे जहाज हिंदी महासागरातील भारताचे सागरी क्षेत्र नगी अधिक सुरक्षित करेल आणि शत्रूपासून सतर्क राहील. जगभर पाण्याखालून सशस्त्र आणि पाळत ठेवणाच्या ड्रोनचे युग सुरू झाले आहे.

आयएनएस ध्रुवची वैशिष्ट्ये

खर्च १५०० कोटी बांधणी वायझॅग येथील हिंदुस्तान शिप क्षमता अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांचा वेध क्षमता. चीन, रशिया, फ्रान्स, अमेरिकेनंतर भारताची निर्मिती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com