विधिमंडळ अधिवेशनात, पत्रकारांचे ज्वलंत प्रश्न मांडावेत,विरोधी पक्षनेत्यांना विनंती

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारकडून राज्यात विविध प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत . या निर्बंधांमुळे पत्रकार देखील फ़ारच अडचणीत सापडला असून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तमाम पत्रकारांचे ज्वलंत प्रश्न मांडून राज्य सरकारला पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत योग्य कार्यवाही करण्यास भाग पाडावे अशी विनंती जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्यावतीने विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
राज्यातील पत्रकारांचा फ्रंटलाईन वर्कर म्हणून शासनाने समावेश करावा ,त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे ,कोरोना काळात
मुत्युमुखी पड़लेल्या अनेक पत्रकारांना आर्थिक सहाय्य करावे , पत्रकारांना विमा संरक्षण दयावे तसेच पत्रकारांना मुंबई लोकल ट्रेन मध्ये अत्यावश्यक सेवाकर्मी म्हणून प्रवासाची मुभा दयावी अशा विविध रास्त मागण्यांचे निवेदन , पत्रव्यवहार सातत्याने शासनाकडे करण्यात आलेला आहे .

परंतु आजपर्यंत राज्यसरकारकडून त्यावर समाधानकारक निर्णय घेतला गेला नाही, या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले होते व राज्यपाल यांनी देखील पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनास योग्य त्या सूचना देण्याबाबत त्यांना विनंती करण्यात आलेली असताना,सरकारकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना या पावसाळी अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळवून देण्याची विनंती जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्यावतीने करण्यात आली आहे .

पत्रकार – उमेश ग. मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com