मुंबई: कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबईकरांना अविरत सेवा देणाऱ्या बेस्टच्या धारावी काळाकिल्ला आगार येथील बस चालक, वाहक आणि सर्व कामगार यांचा कोविड योद्धा गौरव सन्मानपत्र, मास्क, सेनेटायझर देऊन सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धारावी युवासेनेतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेचे धारावी विधानसभा विभाग अधिकारी रोहित खैरे यांनी केले होते. याप्रसंगी युवासेना सहसचिव बृहन्मुंबई महानगरपालिका शालेय शिक्षण समिती साईनाथ दुर्गे, शिवसेना धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, ज्येष्ठ समाजसेवक आशिष मोरे, शिवसेना फलटण संपर्क प्रमुख प्रमोद माने, बेस्ट कामगार सेनेचे अशोक शेजवळ, माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, नगरसेवक वसंत नकाशे, उपविभाग प्रमुख प्रकाश आचरेकर, जोसेफ कोळी, महादेव शिंदे, शाखाप्रमुख सतिश कटक, आनंद भोसले, सुरेश जाधव, किरण काळे, भास्कर पिल्ले, मुत्तु पट्टण, युवा सैनिक चेतन सूर्यवंशी, अमोल चौगुले, विनोद डोईफोडे, मंगेश रणदिवे, श्रीधर गोगीकर, रोहित काळे, सागर बोबडे, शिवा मैत्रे, शरद सोनवणे, प्रसाद बोबडे, हेमंत नाचरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
