देशाच्या संरक्षणासाठी समर्पित होण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्याने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत भरती मेळाव्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती देण्यात आली आहे. भरतीमध्ये सामील होण्यासाठी, सर्व उमेदवारांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय लष्कर www.joinindianarmy.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील.
जुलैपासून सुरू होईल नोंदणी :-
अग्निवीर भरती रॅलीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया जुलै 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती भारतीय लष्कराने जारी केलेल्या अधिसूचनेत दिली आहे. खालील पदांसाठी होणार आहे भरती
अग्निवीर जनरल ड्युटी
अग्निवीर तांत्रिक
अग्निवीर तांत्रिक (एव्हिएशन/म्युनिशन टेस्टर)
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास
अग्निवीर ट्रेडसमन आठवी पास
पगार किती असेल-:
भारतीय लष्कराने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अग्निवीरच्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 30,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 33,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 36,500 आणि चौथ्या वर्षी 40,000 रुपये वेतन आणि भत्ते दिले जातील. सोबतच निवृत्तीच्या वेळी सेवा निधीही दिला जाणार आहे.
नियम आणि अटी-:
अग्निवीरांची 4 वर्षांच्या सेवा कालावधीसाठी आर्मी ऍक्ट 1950 अंतर्गत नोंदणी केली जाईल.
अर्जदारांची वयोमर्यादा 17.5 ते 23 वर्षे दरम्यान असावी.
आदेशानुसार अग्निवीर जमिनीवर, पाण्यात आणि हवेत कुठेही पाठवता येतात.
नामांकित अग्निवीर कोणत्याही पेन्शन किंवा ग्रॅच्युइटीसाठी पात्र असणार नाही.
चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना सेवा मुक्त केले जाईल.
डिस्चार्जच्या वेळी त्यांना सेवा निधी दिला जाईल.
आवश्यक पात्रता काय आहेत-:
जनरल ड्युटीसाठी, उमेदवारांना एकूण 45% गुणांसह 10वी पास असणे आवश्यक आहे.
अग्निवीर तांत्रिक (एव्हिएशन/म्युनिशन टेस्टर) साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयात 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
लिपिक/स्टोअरकीपर पदांसाठी 60% गुणांसह 12वी पास. इंग्रजी आणि गणितात ५०% गुण आवश्यक.
ट्रेड्समनसाठी 10वी आणि 8वी उत्तीर्ण उमेदवारांची स्वतंत्र भरती असेल. अर्जदाराला सर्व विषयात 33% गुण असावेत.