लालबाग मध्ये ‘वन अविघ्न पार्क’ या आलीशान इमारतीला भीषण आग

मुंबई – आज दुपारी १२ च्या सुमारास लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला भीषण आग लागली. अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल तीनची असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतमाता थिएटर समोर वन अविघ्न पार्क ही इमारत आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून आग १९ व्या मजल्यावर लागली आहे. आग लागल्यानंतर काहींनी खाली उड्या मारल्याची दृष्यही समोर आल्याचे एबीपीने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान पडलेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. ही प्राथमिक माहिती स्थानिक आमदार अजय चौधरींनी दिली आहे. पाचव्या माळ्यावर आग लागल्यानंतर ती १९ व्या माळ्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. या भागामधील गल्ल्या आणि रस्ते अरुंद असून अग्निशामन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचायला वेळ लागू शकतो. तसेच आग १९ व्या मजल्यावर लागल्यामुळे तिथपर्यंत पोहचण्यास आखणीन वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com