पनवेल शहर निवड चाचणी जल्लोषात संपन्न

मुंबई : १ली पनवेल शहर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१
दि.१७ ऑक्टोबर २०२१ रोजी तालुका क्रीडा संकुल पनवेल येथे मोठया उस्साहात परपडली हि स्पर्धा किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन महाराष्ट्र (वाको महाराष्ट्र) मान्यतेने घेण्यात आले व आयोजन अम्याच्युअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन पनवेल यांनी केले व स्पर्धेचे उद्धटण श्रीफळ वाढवून करण्यात आले कार्यक्रसाठी विडिओ कॉन्फरेन्स ने निलेश शेलार सर अध्यक्ष किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन महाराष्ट्र यांनी सर्वांचे मनोबल वाढवले व योग्य मार्गदर्शन केले. प्रमुखपाहुणे म्हणून राजू कोळी सर,अध्यक्ष जयेश चोगले, अम्याच्युअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन पनवेल, सचिव कु दिक्षा जैन अम्याच्युअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन,उपाध्यक्ष भूपेंद्र गायकवाड सर अम्याच्युअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन पनवेल, महेंद्र कोळी सर, मंदार चावळकर सर, हिरा घरती सर,गोपाळ म्हात्रे सर, संतोष मोकल सर,योगेश जाधव सर, वैभव राहते सर याच्या हस्ते करण्यात आला.
संपूर्ण पनवेल शहरातून एकूण १६० खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला व ३४ पंच परीक्षा या साठी सहभाग घेतला ही स्पर्धा संपूर्ण नियमात खेळविण्यात आले व खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी दाखवली.
प्रथम क्रमांक राजू कोळी सर व टीम, द्वितीय क्रमांक भूपेंद्र गायकवाड सर व टीम, तृतीय क्रमांक वैभव राहते व टीम, चतुर्थ क्रमांक मंदार सर व हिरा सर या प्रवणे चॅम्पिनशिप ट्रॉफी या संघाने पताकावले.
या स्पर्धेत अध्यक्ष जयेश चोगले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचाली साठी सर्वाना शुभेच्छा दिल्या व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी कु शिल्पाम सरकार, केदार खांबे, वैष्णवी कोंढाळकर धनेश शिंगोटे,मृणाली धुमाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लागले या स्पर्धेतील सुवर्ण पदक खेळाडू पुढील स्पर्धा २२,२३,२४ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क ९७६८१५४५२७

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com