आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी वाको इंडिया चे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांनी कीक बॉक्सिंगचे अंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर भारतातील मुलांसाठी आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या झालेल्या आयोजनात भारतासह जॉर्डन, इराक, युएई, इजिप्त, अल्जेरिया, मोरोक्को, लिबिया, सीरिया, सौदी अरेबिया अशा दहा देशांच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता याच बरोबर महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यातून खेळाडू व प्रशिक्षकांनी यात आवर्जून सहभाग घेतला होता. वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते त्याचरोबर अनिल मिरकर, रणजित कथाडे, उमेश मुरकर, कृष्णा ढोबळे, विशाल सिंग, मुंडपात हे सिनियर प्रशिक्षक सहभागी झाले होते
प्रतिनिधी – राजेंद्र शिरोडकर