भारतीय जनता पक्षा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा “सेवा सप्ताह” म्हणून साजरा केला जातोय. यानिमित्ताने १६ सप्टेंबर २०२० रोजी धारावी विधानसभा प्रभाग -१८४ मध्ये स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सर्व कार्यकर्त्यांनी सहील हॉटेल ते धारावी पोलिस स्टेशन सफाई कार्यक्रमास सुरुवात केली.
यावेळी श्री मनी बालन ( धारावी विधानसभा- अध्यक्ष), श्री सत्तार आगवान ( धारावी विधानसभा- महासचिव), श्री अनन्त भंडारी (कार्यक्रम जिला संयोजक),
श्री संतोष शर्मा ( धारावी विधानसभा अध्यक्ष- उत्तर भारतीय), श्री रमेश नाडार(S.E.O), श्री भुपेन्द्र जैसवार (पुर्व वार्ड अध्यक्ष-१८४), श्री दुर्गा प्रसाद शाहू ( वार्ड महामंत्री-१८४),
श्री अब्दुल रहीम खान ( वार्ड महामंत्री-१८४), अजय श्रीवास्तव ( युवा मोर्चा अध्यक्ष -१८४),
श्री संजीव गिरधारीलाल हिंदुजा (वार्ड उपाध्यक्ष-१८४), श्री अरुण जायसवाल
श्रीमती संगीता पटवा, श्री विजय लक्ष्मण जायसवाल, श्री सुरेन्द्र रेवाले,
श्री प्रदीप शिंदे स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते.
प्रतिनिधी -उमेश मुरकर