संचारबंदीच्या काळातही विनाकारण घराबाहेर पडून आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्या मुंबईकरांवर आता पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. उद्यापासून मुंबईत खासगी वाहनांसाठी कलरकोड सिस्टम लागू होणार आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी? लाल रंगाचं वर्तुळ लावणं बंधनकारक असेल. भाजीपाल्याच्या गाड्यांसाठी? हिरव्या रंगाचं तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी ?पिवळ्या रंगाचं वर्तुळ असणं अनिवार्य करण्यात आलंय. सदर कलर कोड हे नजिकच्या पोलीस स्टेशनला उपलब्ध होणार. कलरकोडचा गैरवापर केल्यास ४१९ कलमाखाली गुन्हा दाखल करणार असल्याची मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंनी दिली आहे