मुसळधार पावसामुळे वरळी पोलिस कॅम्प मधील संरक्षक भिंतीचा भाग कोसळला

आज वरळी पोलीस वसाहतीतील भिंत पावसामुळे कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तेथील स्थानिकांशी पर्यावरण मंत्री मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांनी चर्चा करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना योग्य निर्देश दिले. यावेळी माजी आमदार सुनिल शिंदे, नगरसेवक आशिष चेंबूरकर, पालिका आयुक्त इक़बाल चहलजी ,सहाय्यक आयुक्त शरद उघाडे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुखलाल वर्पे ,युवासेना उपविभाग अधिकारी श्री अभिजित पाटील ,शाखाप्रमुख श्री जिवबा केसरकर महिला उपशाखासंघटक कल्पना सुर्वे , ज्योती तोंडवलकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिनिधी – राजेंद्र शिरोडकर

Leave a Reply

Your email address will not be published.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com