मुंबईत “काळ नदी बचाव समिती” ची स्थापना

मुंबई : रायगड मधील महाड तालुक्यातील रहिवाशांनी पुढाकार घेऊन मुंबईत केली काळ नदी बचाव समितीची स्थापना मुंबई महाड तालुक्यात जुलै महिन्यात आलेला महाप्रलय, महापूर ,महापूराची कारणे शोधण्याचे प्रयत्न अनेक जलतज्ञ, अभियंते ,अतिशय गंभीरपणे विचार करत आहेत .परंतु गेल्या दहा ते बारा वर्षात महाड रायगड या भागात निसर्गाचा पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात रहास झालेला आहे विकासाच्या नावाखाली अथवा विकास कामे करत असताना अनेक डोंगर फोडणे, झाडे. डोंगरांना आगी लावणे .इत्यादी घटना वाढत असतानाच रेती माफियांचे प्रमाण देखील वाढत चाललंय रेतीचा उपसा खाडी पट्ट्या पासून तर नद्यांचा उगम पर्यंत मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र स्थानिक प्रतिनिधींचा त्याकडे दुर्लक्ष होत राहिला आहे वाळू माफिया आणि प्रशासन यांच्या संगनमताने निसर्गाची होत असलेली हानी यावरती गांभीर्याने विचार करण्याची गरज असताना काही सामाजिक भान असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळ नदी बचाव समिती ची स्थापना केली आहे या समितीचे उद्घाटन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीयुत नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते आज मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी करण्यात आली
न्यूज नरेंद्र वाबळे यांनी समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले त्याच प्रमाणेआपण सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शविली. या कार्यक्रमाला गाव पातळी पासून मुंबई आणि उपनगरातील रायगड वासीय उपस्थित होते.
वाळू माफिया यांच्यामुळेच आज पाण्याचा तुटवडा त्याचप्रमाणे नदीचा प्रवाह देखील बदलत चालला आहे .नद्यांची खोली बुजलेली आहे. त्यामुळे गोड्या पाण्याचा साठा देखील कमी होत चालला आहे. यासाठी पाटबंधारे बांधण्याची गरज आहे परंतु या गोष्टीकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.अशी खंत काळ नदी बचाव समितीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली .वाळू माफियांवर कारवाई न झाल्यास सहा डिसेंबर रोजी चवदार तळे याठिकाणी उपोषण करण्यात येणार असल्याचे मत,समितीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com