वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रेशनकार्डची अट नाही असे शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी कळवलं आहे. याबाबत आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र दिलं होतं. अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची बिलं नाकारली जात होती. रेशनकार्डात नाव असल्याची अट टाकली जात होती. अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रेशनकार्डची अट नाही याबाबत शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त, सर्व विभागीय उपसंचालक आणि सर्व प्राथमिक / माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनाही कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
सुभाष मोरे 09920933929