तिरुमला क्लिनिकमध्ये मधुमेहाच्या (डायबिटीज) या रुग्णांसाठी मधुमेहाच्या शिबीराचे आयोजन. रक्ताची तपासणी व त्यावरील मोफत औषध उपचाराच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले.

धारावीतील तिरुमला क्लिनिक मध्ये लिव्हर फ्रायनोस्कॅन नंतर मधुमेहाच्या दि. १६/११/२०२१ रोजी धारावीतील डॉ. अरविंद वाघमारे व डॉ. अंजली वाघमारे यांच्या तिरुमला क्लिनिकमध्ये मधुमेहाच्या (डायबिटीज) या रुग्णांसाठी मधुमेहाच्या
शिबीराचे आयोजन. रक्ताची तपासणी व त्यावरील मोफत औषध उपचाराच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले.
आपल्या भारतात वाढत्या मधुमेहाच्या रुग्णांची संख्या पाहता व त्यासाठी वेळीच त्याचे निदान होऊन त्यावर औषध उपचार चालू करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नवीन मधुमेह झालेल्या (Newly Detected) व पूर्वी मधुमेह असलेल्या दोन्ही रुग्णांचे निदान व उपचार करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी मधुमेह न होण्यासाठी व झाल्यानंतर आहार विहार कसा असावा याचे मार्गदर्शनही केले. त्याचबरोबर मधुमेहाबद्दलचे समज व गैरसमजाबद्दल रुग्णांना माहिती दिली.
या शिबिरासाठी डॉ. अरविंद वाघमारे यांना श्री. मनिष चौधरी व ओमप्रकाश चौधरी , यांचे मोलाचे योगदान भेटले. या शिबिरात सुमारे २५० रुग्णांची मधुमेह चाचणी करुन त्यांना औषधे देण्यात आली.
या शिबिराची समाजात गरज पाहता डॉ. अरविंद वाघमारे व त्यांच्या टीमने पुन्हा २६ जानेवारी २०२१ रोजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत रक्ताची तपासणी व औषधाच्या शिबिराची घोषणा केली आहे. तरी सर्व धारावीच्या जनतेला आवाहन केले आहे की, सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com