इस्लाम धर्मीय वसीम रिझवी ने हिंदू धर्म स्वीकारला आहे. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर रिझवीं ने मुस्लिम धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल आहे. रिझवींनी धर्म स्वीकारल्यानंतर आता त्यांचे नाव हरबीर नारायण सिंह त्यागी असे ठेवण्यात आले आहे.
मुस्लिम लोकांनी इस्लाम धर्मातून बहिष्कृत केले यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हा माझा निर्णय आहे. जगातील पहिला धर्म हा सनातन आहे. यामध्ये मानवता आणि चांगुलपणा आढळतो असे वक्तव्य रिझवींनी केलं आहे.
मुस्लिम म्हणायला मला लाज वाटत असल्यामुळे धर्म परिवर्तन केलं असल्याचे वसीम रिझवी ने म्हटलं आहे.
वसीम रिझवी चे गाझियाबादमधील दासना देवीच्या मंदिरात महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी सर्व विधींनुसार हिंदू धर्मात परिवर्तन करत आहेत. रिझवींचे शुद्धीकरण देखील करण्यात येत आहे.
वसीम रिझवी ने काही दिवसांपूर्वी मृत्यूपत्र जारी केले आहे. या मृत्यू पत्रात त्यांनी मृतदेह दफन न करता हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात यावे असे म्हटलं आहे.
गाझियाबादमधील दासना देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी रिझवींच धर्म परिवर्तन केल आहे. वसीम रिझवी ला मुस्लिमांनी बहिष्कृत केलं आहे. कुराणमधील श्लोकांविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यामुळे रिझवी विरोधात मुस्लिम समाज संतप्त झाला आहे.
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी ने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मुस्लिम धर्माविरोधात घणाघात केला आहे. हिंदू धर्म यांना सनातन धर्म मिळवून दिला असून त्यांचे नावही बदलण्यात आले आहे.
तसेच नरसिंहानंद गिरी महाराजच चीतेला अग्नी देतील असे रिझवीने मृत्यूपत्रात म्हटलं आहे. कुराणमधील २६ श्लोकांविरोधात रिझवींने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुराणमधील २६ श्लोक काढून टाकण्याची मागणी रिझवी ने केली होती.
धर्मांतर करताना वसीम रिझवी म्हणाले, हे धर्मांतर नव्हे. मला इस्लाममधून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे पुढे कोणता धर्म स्वीकारायचा, ही माझी मर्जी आहे. सनातन धर्म हा जगातील सर्वत पहिला धर्म असून त्यात मानवतेशी निगडीत असंख्य चांगल्या गोष्टी आहेत.
२००० साली रिझवी लखनौच्या काश्मिरी मोहल्ल्यातून सपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर २००८ मध्ये ते शिया वक्फ बोर्डाचे मेंबर झाले. २०१२ साली त्यांची सपातून हकालपट्टी झाली.
रिझवी आधीपासूनच मुस्लिम धर्मियांच्या निशाण्यावर आहेत. कुराणातील २६ आयती मुस्लिमांमध्ये हिंसेला खतपाणी घालतात, त्या मूळ कुराणाचा भाग नव्हत्या, नंतर त्या जोडल्या गेल्या, अशी भूमिका रिझवी ने घेतली होती.