माणुस नाही, देवमाणूस ! रेल्वे चा सुपरहिरो श्री मयूर शेळके यांना २०२१ कर्तव्य क्षेत्र, महाराष्ट्र खेल पुरस्कार जाहीर

मुंबई : खाली पडणे हा अपघात आहे. पण ते पाहून त्वरित कृती करणे व संपूर्ण जगात भारताचे व महाराष्ट्राचे नाव रोशन करून जगातील एकमेव नैतिकता, समर्पण व स्वतःला सिद्ध करून दाखवणारा मध्य रेल्वे चा सुपरहिरो श्री मयूर शेळके.
धावती ट्रेन समोरून येत असताना जीवाची बाजी करून काही सेकंदात रेल पटरीवरून मुलाला सुखरूप बाहेर काढून प्राण वाचविणाऱ्या मध्य रेल्वेचा सुपरहिरो मयूर शेळके यांना भारतीय खेल दिवस २९ ऑगस्ट या दिवशी होणारा महाराष्ट्र खेल पुरस्कार हा मध्य रेल्वे चा सुपरहिरो श्री मयूर शेळके यांना जाहीर करण्यात आला आहे . सर्व क्षेत्रातून मयूर चे कौतुक होत आहे. महाराष्ट्र खेल पुरस्कार निर्देशक आणि आयोजक श्री विशाल जाधव यांनी कर्तव्य या क्षेत्रातून सैनिक, पोलीस, डॉक्टर, हेल्थवर्कर, रेल्वे, बेस्ट,फायरब्रिगेट,सफाई कामगार आदी आपले कर्तव्य बजावीत असताना समाजासाठी आपले योगदान देतात. त्यासाठी कर्तव्य या क्षेत्राचा पहिला मानकरी म्हणून रेल्वेत कार्यरत असणारे मयूर शेळके याची निवड केली आहे. ऑन ड्युटी असताना मयूर याने चुकून पटरीत पडलेल्या अंध महिलेच्या मुलाला पाहिले. समोरून रेल येत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता तितक्याच चपळाईने स्वतःही काही क्षणाच्या अंतरावर रेल्वे येत असताना स्वतःही पटरीवर उतरून त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले. हे सर्व काही सेकंदात घडले. मयूरची चपळाई आणि धाडसी वृत्ती चित्रपटच्या नायका सारखी आहे. त्यांच्या या कामगिरीला महाराष्ट्र सलाम केला आहे. या उद्देशाने २०२१ कर्तव्य क्षेत्र महाराष्ट्र खेल पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती विशाल जाधव यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com