मुंबई : १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रत्येक देशवासीय हा खास सोहळा खास पद्धतीने साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येकाने घराघरात तिरंगा लावण्याचे आवाहनही सरकारने केले आहे. सरकारच्या आवाहनाचा लोकांवर परिणाम होताना दिसत आहे, देशवासीय प्रत्येक घर, कार्यालय, ऐतिहासिक वास्तू आणि इतर ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवत आहेत. हा खास सोहळा अधिक खास आणि उत्कृष्ट बनवत धारावीत दि.१४/०८/२०२२ रोजी धारावी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्वातंत्र्यचा अमृतमहोत्सव निमित्त तिरंगा रॅली आयोजित केली होती.

सदरची तिरंगा रॅली अशोक मिल नाका येथुन सकाळी १०:५५ वाजता सुरू होऊन ९० फिट मार्गे- धारावी पोलीस ठाणे येथे ११:३० वाजता समाप्त झाली. सदर रॅलीकरिता ८०-९० धारावी पोलीस ठाणेचे अधिकारी/अंमलदार, धारावी वाहतूक शाखेचे अधिकारी/अंमलदार, मोहल्ला कमिटी, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
