भारत बायोटेकच्या नाकाद्वारे करोना लसीसाठी मोजावे लागणार इतकी किंमत

चीन सह अन्य देशात होत असलेल्या करोना उद्रेकाने भारत सरकार सावध झाले असून २३ डिसेंबर २०२२ ला भारत सरकारने भारत बायोटेकच्या जगातील पहिल्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या ‘इनकोवॅक’ या लसीला मंजुरी दिली आहे. ही लस जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. बुस्टर डोस म्हणून ही लस घेता येणार असून ती सिंगल डोस लस आहे. या लसीच्या किमती भारत सरकारने निश्चित केल्या आहेत.

१८ वर्षापुढील नागरिकांना आणि ज्यांनी करोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनलचे अधिकारी म्हणाले, इनकोवॅक कोविन वेबसाईटवर लिस्ट झाली असून बाजारात ती जीएसटी वगळता ८०० रुपयांना तर सरकारी रुग्णालयात जीएसटी वगळून ३२५ रुपयांना मिळेल. खासगी रूग्णालये आणखी वेगळे चार्ज लावू शकणार आहेत. कोवीशिल्ड किंवा कोवॅक्सीनचे दोन डोस घेतलेल्यांना ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे. ज्यांनी बुस्टर डोस अगोदरच घेतला आहे त्यांना ही लस पुन्हा घेण्याची गरज नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com