
मुंबई दिनांक ४ फेब्रुवारी: सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेत्री ” उमा प्रकाश भेंडे ह्या व प्रकाश भेंडे यांचे कुटुंब गेली ५५ ते ६० वर्ष सायन येथे रहात आहेत. यांच्या रहात्या निवासस्थानाचे पूर्वीचे नाव राधाकृष्ण निवास होते. १९८० साली घर मालक बदलला व त्यांच्या निवासाचे नाव लक्ष्मी निवास असे ठेवण्यात आले. प्रकाश भेंडे गेली ४२ वर्षे त्यांची पली, जेष्ठ अभिनेत्री सौ. उमा भेंडे सोबत राहत आहेत. याप्रसंगी प्रकाश भेंडे यांनी या बद्दल भावना व्यक्त करताना म्हणाले की माझ्या पत्नीचे नाव आमच्या निवासाच्या समोरील चौकाला’ सौ. उमा प्रकाश भेंडे चौक करण्यात आले आहे. याबद्दल मी सर्वाचा आभारी आहे. या समारंभास गुरुवार, दि. ०४/०२/२०२१ रोजी. सकाळी ११.०० वा. भाजपा आमदार श्री. आशिष शेलार साहेब उद्घाटक म्हणून हजर होते. या कार्यक्रमास संपूर्णता श्री. राजेश शिरवाडकर द. म. मु. जिल्हा अध्यक्ष भाजपा) नगरसेविका-सौ. राजेश्री राजेश शिरवडकर (भाजपा) यांच्या संकल्पनेने ज्येष्ठ अभिनेत्री ‘सौ. उमा प्रकाश भेंडे चौक’ करण्यात आले आहे. आमदार श्री. प्रसाद लाड, आमदार श्री. कॅप्टन तमिल सेलवन, आमदार श्री. कालिदास कोळंबकर हे उपस्थित होते,. शिक्षण मंत्री व स्थानिक आमदार वर्षाताई गायकवाड यांनीही आपली उपस्थिती देऊन भेंडे कुटुंबीयांना सदिच्छा दिल्या


