मुंबई : राज्य निवडणूक आयोगाचे मतदाता नोंदणी आणि यादी अद्ययावत करण्याचे अभियान सुरू आहे. जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांना मतदान अधिकार मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते साई भाई रामपूरकर तसेच शिवशक्ती फाऊंडेशनचे विकी शिंदे यांनी मतदार नोंदणी अभियान सुरू केले. सर्वसाधारण नागरिकांसाठी सगळेच पुढाकार घेत असताना यांनी किन्नर समुदायाला मतदानाचा अधिकार मिळवून दिला. १८२-वरळी विधानसभा मतदान संघ येथे ही प्रक्रिया संपूर्ण करण्यात आली. त्यावेळी नोंदणी अभियान मतदार अधिकारी डॉ. शिवाजी पाटील, वरळी विभाग मतदार अधिकारी वारे तसेच सर्व कर्मचारी वर्गाने बहुमूल्य सहकार्य केले.