स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी हिंदुमहासभेचा मेळावा…भाजप-संघ यांच्याबद्दल आजही हिंदूमध्ये संदिग्धता – सतीश देशपांडे

मुंबई : देशात आणि राज्यात भाजपप्रणित सरकार असूनही हिंदूमध्ये त्यांच्या भूमिकेबविषयी संदिग्धता दिसून येत आहे. काँग्रेसच्या धोरणानुसार त्यांच्याकडूनही मुस्लिमांचेही लांगुलचालन सुरु राहिले आहे. संघाचे इंद्रेशकुमार देखील रझाकारांनी केलेल्या कृतीबद्दल झाले गेले विसरून जा, असे म्हणून अन्याय झालेल्या हिंदूंच्या दुःखांवर मीठ चोळले आहे. या एकंदरीत भूमिकेमुळे भविष्यात भारत हा भौगोलिक पातळीवर देश म्हणून असेल पण प्रत्यक्षात हिंदू संस्कृतीचा ऱ्हास सुरु होईल, अशी भीती अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर आजही संघ आणि भाजप यांच्या भूमिकेबद्दल हिंदूमध्ये संदिग्धता आहे. किंबुहना याबाबत ते काँग्रेसच्या पुढे आहे, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पण दिनानिमित्त “अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने सावरकर भक्तांचा मेळावा, दादर” येथील पाटील मारूती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते भाजपा काँग्रेसच्या वाटेवर या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अखिल भारत हिंदू महासभेचे केंद्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले यांनी हिंदूंच्या रक्षणार्थ आजच्या घडीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारानुसार कार्य आणि कृतीशील अंमलबजावणी करणारा केवळ हिंदू महासभा हाच एकमेव पक्ष आहे. त्यामुळे निराश न होता हिदूंनी त्यांच्या रक्षणार्थ हिंदू महासभेकडे अवश्य यावे, भारत हा खऱ्या अर्थाने हिंदुराष्ट्र होईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि हिंदू महासभेचे मुंबई अध्यक्ष अनुप केणी यांनी भाजपच्या शायनिंग वृत्तीचा समाचार घेतला. वाजपेयी सरकारच्या काळात प्रमोद महाजन यांनी शायनिंग इंडियाचा प्रयोग केला. तर सध्या मोदीच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार विकासाच्या नावाखाली जाहिरातींवर वारेमाप खर्च आहे. त्याच्या आड ते हिंदुत्वावादाला लपवत हिंदूंची दिशाभूल करत आहेत. शिवाय त्यांनी निरपेक्षपणाचा बुरखा इतका पांघऱला आहे की, ते आता त्याबाबतीत काँग्रेसच्या पुढे गेले आहेत, असेही ते म्हणाले. पाटील मारुती सभागृहात सावरकरभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या राष्ट्रगीताने झाली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com