मुंबई : स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असताना पवई येथे
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग ( नीटी )
येथे स्वतंत्र लढ्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचा देशाला विसर पडला आहे. याच घडामोडी गणेश उत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढी समोर ठेवल्या जाणार आहेत.
देशातील नव्या पिढीला स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदाना बाबत माहिती नाही. नीटी गणेशोत्सवाच्या माध्यमातून हे कार्य पार पडले.
नीटी चे डायरेक्टर प्राध्यापक डॉ. मनोज कुमार तिवारी यांनी श्री गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रिष्ठापना पूजा केली. यावेळी गणपतीची आरास म्हणून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षाची संकल्पना प्रस्तुत करण्यात आली आहे. छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मंत्रांपासून ते थेट भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविंधनिक अधिकारापर्यंत त्यांच्या प्रतिमेच्या रूपाने चित्रित करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं हिंदुत्व, पंडित नेहरूनचा समाजवाद, महात्मा गांधी यांची अहिंसा, तर भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांची क्रांती ते थेट सुभाषचंद्र बोस यांच्या इंकलाब चा प्रतीकात्मक यात समावेश करण्यात आला आहेे
