नववर्षाच्या प्रारंभीच मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कोरोनाच्या काळात आपले पोलीस फ्रंटलाइनवर लढले. जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच आहे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले. एवढेच नाही तर कोरोनाच्या काळात आपण लॉकडाऊन केले, निबंध लादले, वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला. मात्र, पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केले असते तर? क्षणभर विचार केला, पोलिसांनी असे केले असते तर काय झाले असते? पण तसे झाले नाही. पोलीस फ्रंटलाइनवर काम करत होते म्हणूनच नागरिकां कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली. कोरोनासोबतच्या लढ्यात अनेक पोलीस शहीद झाले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःखही व्यक्त केले.
‘महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही. नववर्ष पोलिस दलातील सर्वांसाठी तणावमुक्तीचे जावो, ही प्रार्थना,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलिस दलातील अधिकारी, कर्चमाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.