मुंबई : मुंबई शहरात आज सकाळी धुक्याचे प्रमाण वाढले आहे. सायन येथील किल्ल्यावर धुक्याची चादर पाहून नागरिकांना आनंद झाला. किल्ल्यावर येणारे स्थानिक नागरिक व पर्यटकांनी या
निसर्गरम्य वातावरणाचा भरपूर आस्वाद घेतला.
मुंबईत असे वातावरण फार क्वचित अनुभव घेण्यास मिळते. थंडीचा कडाका वाढत असताना सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला. उत्साही नागरिकांनी धुक्यात फोटोसेशन केले.