मुंबई : दक्षिण मुंबईत शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने आयोजित केलेल्या ६५ व्या विवेकानंद व्याख्यानमालेत दक्षिण मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे माजी मंडळप्रमुख, महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त श्री. गजानन लक्ष्मण रेवडेकर यांनी विद्यार्थी उत्कर्ष मंडळात पन्नास वर्ष कार्यरत असल्याबद्दल ५०० पासेस तर व्याख्यानमालेचे ६५ वे वर्ष असल्याने ६५ पासेस असे एकूण ५६५ पासेस वैयक्तिकरित्या संपविण्याचा संकल्प पूर्ण करुन, सन १९७६ पासूनचे आपलेच जुने सर्व विक्रम मोडून वयाच्या ६५ वर्षी नवीन विक्रम केल्याबद्दल व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे उद्घाटक सौ. शुभदा दांडेकर उद्योजिका कॅमल इंक आणि पद्मश्री डाॅ. रवींद्र कोल्हे यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा देऊन श्री. रेवडेकर यांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी मध्यभागी मंडळप्रमुख श्री. सचिन हराळे. तसेच संवादक श्री. किशोर टापरे व विवेकानंद व्याख्यानमाला प्रमुख श्री. कमलेश जगदाळे.
श्री. रेवडेकर हे नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष असून, सहकार रात्र शाळा व महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले १९६६ पासूनचे सैनिक आहेत. त्यांनी बीएस्ईएस् मध्ये स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन करण्यात सहभाग घेतला आहे. सामाजिक जाणीव असलेल्या या कार्यकर्त्याचा जनमाणसात प्रभाव असल्यानेच ते असे विक्रम करू शकतात. त्यांनी हा सन्मान विश्वासाने विवेकानंद व्याख्यानमालेचे पासेस घेतलेल्या जनता जनार्दन आणि आपल्या मातोश्रीच्या चरणी अर्पण केला. यावेळी प्रमुख वक्ते डाॅ. रवींद्र कोल्हे यांनी गजानन रेवडेकर यांनी ५६५ पासेस संपवून त्याचा रोख भरणा मंडळात केल्याबद्दल आपल्या व्याख्यानात शाब्बासकी देत, असेच कार्यकर्ते समाजाचे प्रेरणास्त्रोत असतात, असे प्रतिपादन केले. श्री. रेवडेकर यांनी पासष्टाव्या वर्षी ५६५ संपविण्याचा शिवधनुष्य उचलल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
