शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन

मुंबई : शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक बाबासाहेब पुरंदरे यांचं आज निधन झालं. त्यांनी या वर्षी शंभरीत पदार्पण केलं होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. घरात घसरुन पडल्याने बाबासाहेब पुरंदर यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी पहाटे ५ वाजून ७ मि. त्यांचे निधन झाले
बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक विषयांवर लिखाण केलं. त्यांनी जाणता राजा या गाजलेल्या प्रसिद्ध नाटकाचं देखील दिग्दर्शन केलं. शिवचरित्र घराघरात पोचवण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी अथक परिश्रम आणि संशोधन करत राजा शिवछत्रपती हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या सोळा आवृत्या प्रसिद्ध झाल्या असून पाच लाखांपेक्षा जास्त प्रती घराघरात पोचल्या आहेत. मात्र त्यांचे हे लिखाण प्रचंड वादग्रस्त ठरलं. बाबासाहेब पुरंदरे यांना २०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण आणि २०१९ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com