मुंबई : शिवसेना युवासेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने अखंड महाराष्ट्र व स्वाभिमानी मुंबईकरांसाठी भव्य मशाल यात्रेचे यात्रेचे आयोजन प्रत्येक शाखेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली. दक्षिण मुंबईतील ताडदेव हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर, गावदेवी, गोलदेऊल कुंभारवाडा, आर्यन हायस्कूल गिरगाव, मुंबादेवी मंदिर, पिकेट रोड हनुमान मंदिर, कुलाबा शाखा शिवमंदिर अशा विविध भागातून शिवसैनिक प्रचंड संख्येने उपस्थित होते, मशाल हाती घेऊन विविध प्रकारचे घोषवाक्यांचे प्रतीक हाती घेऊन, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नावांचा जय जय कार करीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देत विविध ठिकाणावरून भगवे झेंडे मोटारसायकल वर फडकवित हुतात्मा चौक येथे जमा झाले. या भव्य मशाल यात्रे मध्ये शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेत्या मीनाताई कांबळी, आशाताई म्हामेडी सामील झाले होते. शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मशाल चिन्ह हाती घेऊन या मशाल यात्रे मध्ये सामील झाले होते, हुतात्मा चौक मध्ये हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून, पायी शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा रिगल चित्रपटगृह समोरील स्मृती स्थळावर जाऊन तिथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. याप्रसंगी संबळ वाद्य व संबळ गायक देखील मशालयात्रेत सहभागी झाले होते. मशाल यात्रेचे योग्य नियोजन व व्यवस्थापन विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ व महिला विभगसंघटक सौ. युगंधरा साळेकर यांनी केले.