रोहित शर्मा नव्या रेकॉर्ड साठी सज्ज, रोहित सलग सात टी २० वर्ल्ड कप खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनेल

टीम इंडियाचा हिटमन रोहित शर्मा रविवारी पाकिस्तान विरुद्ध दुबईच्या मैदानावर उतरताच एक नवे रेकॉर्ड नोंदविणार आहे. रोहित सलग सात टी २० वर्ल्ड कप खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनेल. २००७ मध्ये रोहितने टीम इंडियातर्फे पहिला टी २० वर्ल्ड कप खेळला होता. या नव्या उपलब्धीने तो माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याचे सलग सहा टी २० वर्ल्ड कप खेळण्याचे रेकॉर्ड मोडेल. यंदा धोनी टीम इंडिया बरोबर मार्गदर्शक म्हणून आहे.
या रेकॉर्ड बरोबर रोहित टी २० विश्वचषक सामन्यात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू म्हणूनही रेकॉर्ड करू शकेल. धोनीने आत्तापर्यंत ३३ सामने खेळले आहेत आणि रोहित २८ सामने खेळून त्याच्या मागे आहे. अर्थात धोनीने सर्व ३३ सामने कप्तान म्हणून खेळले आहेत. त्यात त्याने २० वेळा जय तर ११ पराभव स्वीकारले आहेत.
रोहित बरोबर अन्य सहा क्रिकेटपटू सुद्धा सलग ७ वा टी २० वर्ल्ड कप खेळण्याचे रेकॉर्ड करत आहेत. त्यात बांग्लादेशचे सर्वाधिक तीन खेळाडू आहेत. शकीब, मुशफिकुर रहीम व महमूदुल्लाह अशी त्यांची नावे आहेत. वेस्टइंडीज चे गेल आणि ब्रावो यांचाही त्यात समावेश असून पाकिस्तानचा शोएब मलिक हा एकमेव खेळाडू त्यात सामील आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com