सिमेंट कॉन्क्रीटीकरणावर पडवळांचे लक्ष

मुंबई : पावसाळा म्हंटला की मुंबईत पाणी तुंबतेच. पण त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका काही पुढाकार घेत नाही. हीच वर्षानुवर्ष चाललेली परिस्थिती बदलण्यासाठी आणि “एकच ध्यास, शिवडीचा विकास” हे ध्येय गाठण्याचा विडा प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवसेना नगरसेवक सचिन देवदास पडवळ यांनी उचलला आहे.
शिवडी बिडीडी चाळ क्र. ९ च्या मागील पाण्याच्या टाकी जवळील रस्त्यापासून इमारत क्र. १५ पर्यंत रहदारी करताना नागरिकांना समस्या यायची. विशेष करून पावसाळ्यात तर चालणे देखील कठीण होत असे, म्हणून या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर कामाची सचिन देवदास पडवळ यांनी पाहणी केली त्यावेळेस सोबत फ-दक्षिण मधील ड्रेनेज विभाग अधिकारी मंगेश सावंत, रस्ते विभागाचे राहुल जाधव, दुय्यम अभियंता पेडणेकर व सहकारी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com