मुंबई महापौर चषक किकबॉक्सिंग स्पर्धेत एस. एस. के.के.ए. ला प्रथम विजेतेपद

मुंबई महापौर चषक किकबॉक्सिंग स्पर्धेत एस. एस. के.के.ए. ला प्रथम विजेतेपद
मुंबई : शहाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी (प ), येथे झालेल्या महापौर चषक किकबॉक्सिंग स्पर्धेत शितो रियु स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन (एस एस के के ए) च्या संघाने लक्षणीय कामगिरी करत तब्बल २१ सुवर्ण, १२ रौप्य व ७ कांस्य पदके पटकावत प्रथम क्रमांकाचा चषक मिळवून स्पर्धेवर आपली छाप उमटवली. सदर स्पर्धक स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर चे अध्यक्ष व प्रशिक्षक उमेश ग. मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. स्पर्धेचे आयोजन मुंबई किक बॉक्सिंग असोसिएशन, उपनगर चे अध्यक्ष – विशाल सिंह यांनी केले होते. सदर स्पर्धेत ४० पेक्षा जास्त संघांनी सहभाग घेतला होता. विजयी स्पर्धक – सुवर्ण पदक मुली : हिंदवी बांदिवडेकर, दुर्वा गावडे, मंजिरी मांजरेकर, आरुषी विश्वकर्मा, रसीका मोरे, ईशा चोरगे, सुवर्ण पदक मुले : विघ्नेश मुरकर (दुहेरी पदक), आफताब खान (दुहेरी पदक), यशराज शर्मा (दुहेरी पदक), रोशन शेट्टी, स्पर्श आगवणे, श्रवण निकम, विन्स पाटील, आलोक ब्रीद, अनिकेत जैस्वार, विशाल गुप्ता, अथर्व घाटकर, दर्श म्हसकर रजत पदक मुली : नव्या विश्वकर्मा (दुहेरी पदक), वैष्णवी किरुबाकरण, इशा चोरगे, रजत पदक मुले : तन्मय शर्मा (दुहेरी पदक), रियान सावंत, भूपेश वैती, कांस्य पदक मुले : देवांश झा (दुहेरी पदक), सर्वेश राणे, प्रथम कदम, रितेश नवसुपे, रोशन शेट्टी, श्रवण निकम.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com