मुंबई : रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७८ साली झाली, आजी माजी विद्यार्थ्यांनी बसवलेला बाप्पा “विद्यार्थ्यांचा राजा” नावाने ओळखला जातो. सामाजिक बांधिलकी, संस्कृति आणि परंपरेचं भान राखून बाप्पाचा उत्सव शिस्तीने पार पडला जातो.
कधी वारकऱ्याच्या माध्यमातून संस्कृतीचे दर्शन, कधी मानवाच्या चुकीमुळे झालेला निसर्गाचा कोप, तर कधी साडेतीन शक्तीपिठाच्या माध्यमातून स्त्री शक्तीचे महत्त्व सांगणारा देखावा, हे आणि अशे विविध जनजागृती संदेश आगमन वा विसर्जनाची मिरवणूक असो किंवा मंडपातील देखावा असो काही ना काही जनजागृती चा संदेश देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो देखावा उभारायचं साकारायच काम आजी माजी विद्यार्थीच करतात.
निसर्गाच्या कोपा मुळे आलेला महाभयंकर पुर, करोना काळात ऑक्सीजन मुळे झालेले हाल लक्षात घेऊन आणि पर्यावरण मंत्री श्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या “माझी वसुंधरा” योजनेने प्रेरित होऊन हा संदेश वारली कला वापरून देखाव्या मार्फत लोकांपर्यंत
पहोचविण्याचा प्रयत्न आहे, तसेच ५०० हून अधिक झाड वाटप / लागवडीचा संकल्प मंडळाने घेतला आहे.
बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाला झाड दत्तक घ्यायचं साकडं घालून एक झाड प्रसाद म्हणुन देण्याचा मंडळाचा मानस आहे. या उपक्रमाला श्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचा माझी वसुंधरा या योजनेतून वृक्ष देऊन मोठा हातभार लावला आहे.
निसर्गाचा घेऊ ध्यास, दत्तक घेऊ उद्याचा श्वास!
एक श्वास स्वतःसाठी हजारो श्वास इतरांसाठी..
झाडातून झाड, श्वासांतून श्वास शतकांची साथ, निसर्गाचा अखंड सहवास..
इन्स्टाग्रामवरून बाप्पाची आरती विद्यार्थी घरी असले, तरी त्यांना बाप्पाचे दर्शन व सकाळ संध्याकाळची आरती घरबसल्या vidyarthyancha_raja या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लाइव्ह पाहता येणार आहे.
प्रतिनिधी – उमेश मुरकर – ९८२०४७६१०५