एस एस के के ए ची कराटे बेल्ट परीक्षा चेंबूर मध्ये संपन्न

दिनांक २६ फेब्रुवारी रोजी  सकाळी १० ते दुपारी दोन या  वेळेत बी एम सि  शाळा, कलेक्टर कॉलनी, चेंबूर  येथे  शितोरियू स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असो. ने शिहान उमेश मुरकर ६ डॅन ब्लॅक बेल्टयांच्या मार्गदर्शनाखाली ओ एल जि सी,सायन, ओ एल पी एस, चेंबूर,  टी आर पी, कामोठे,  एच एस एम एच, धारावी,  आर के टू, माटुंगा,  पी डब्लू एस, सायन  या सर्व डोजोनि सहभाग नोंदवित  ७५ कराटेका नी या कराटे ग्रेडिंग परीक्षेत सहभागघेतला, तसेच या प्रशिक्षक सानिकेत साळसकर, राहुल साळुंखे, विघ्नेश मुरकर, श्राव्या  शेट्टी , महेश जाधव, मुस्कान सय्यद, अनुप्रिता घाग,भूपेश वैती, आशिष महाडिक, महेंद्र राज यांनी पंच म्हणून काम पहिले. कराटे मधील विविधबेल्ट कसे व का असतात त्याबद्दल सर्वानाच उत्सुकता असते म्हणून शिहान उमेश मुरकर यांनी पुढील माहिती सर्वाना या प्रसंगी दिली. कराटेची शितो रियू शैली सामान्यत: बेल्ट ग्रेडिंगप्रणाली वापरते ज्यामध्ये अनेक स्तर असतात, प्रत्येक स्तर शैलीमध्ये उच्च दर्जाचे कौशल्यआणि प्रवीणता दर्शवते. सदर परीक्षेचा पहिला स्तर – व्हाईट बेल्ट, या स्तरावरील विद्यार्थीसामान्यतः नवशिक्या असतात आणि शैलीची मूलभूत तंत्रे आणि तत्त्वे शिकत असतात.

दुसरास्तर- येल्लो बेल्ट- या स्तरावरील विद्यार्थ्यांनी मूलभूत तंत्रांची प्राथमिक समज दाखवतातआणि ते त्यांच्या कौशल्यांवर आधारितअसते, तिसरा स्तर-ऑरेंज बेल्ट- या स्तरावरील विद्यार्थीत्यांची कौशल्ये आणि शैलीचे ज्ञान विकसित करतात. ग्रीन बेल्ट, चौथा स्तर – या स्तरावरीलविद्यार्थ्यांनी तंत्रांची चांगली समज दाखवतात आणि त्यांची ताकद आणि लवचिकता निर्माण करतात. ब्लू बेल्ट- पाचवा स्तर- या स्तरावरीलविद्यार्थी त्यांचे तंत्र सुधारत असतात आणि त्यांची क्षमता विकसित करत असतात.  पर्पल बेल्ट,सहावा स्तर- या स्तरावरील विद्यार्थीत्यांच्या तंत्रात प्रगती करतात  आणि त्यांचीशक्ती आणि गती विकसित करतात . ब्राउन बेल्ट, सातवा स्तर – या स्तरावरील विद्यार्थीतंत्रात प्रभुत्व मिळवून त्यांच्या ब्लॅक बेल्ट परीक्षेची तयारी करत असतात. सदर  बेल्टची पातळी तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com