मुंबई : सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल दिनांक १६ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित इलूमिनारे २०२२ मुख्य अतिथी श्री. आर एस नाईकवडी संचालक महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मुंबई, तसेच शालांत परीक्षा मार्च २०२२ मधील प्रथम क्रमांकाने प्राविण्य प्रदान केलेली कुमारी इशा शेट्टी.
इलूमिनारे म्हणजे विविध विषयाच्या संकल्पनांना, कल्पनांना उजाळा देऊन प्रकाशित करणे म्हणजे इलूमिनारे. सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या संस्थेतील सर्व पदाधिकारी यांची ही संकल्पना. शिक्षण हे चार भिंतीतलं न राहता विद्यार्थ्यांच्या विचारांना स्वैर्यता मिळावी, नवकल्पना साकारल्या जाव्यात. त्या कृतीतून प्रत्यक्षात अंमलात आणता याव्यात. त्यामुळे अध्ययन व अध्यापन हे सुकरच न होता आनंददायी सुद्धा होईल ,आणि त्याचा नक्कीच परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये होऊन विद्यार्थी यशस्वीतेचे शिखर नक्कीच गाठतील याकरता हे प्रदर्शन सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले. शालेय शिक्षणातील विविध विषयांद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रयोगाद्वारे प्रतिकृती मांडल्या आहेत नवविचारांचे नवकल्पनांचे आचार आणि विचारांचा मिलाप एकत्रित होऊन अनेक प्रयोग कृतीद्वारे साकारण्यात आले आहेत. नवीन विविध प्रयोगाद्वारे अध्ययन व अध्यापन अतिशय प्रभावी होऊ शकते असे विविध विषयांचे प्रकल्प विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने तयार करून प्रदर्शनात मांडले आहेत. पालक विविध शाळेतील विद्यार्थी शिक्षक वर्ग तसेच स्थानिक नागरिक यांनी या प्रदर्शनास भेटी दिल्या आणि विद्यार्थ्यांच्या विचार संकल्पनेला व त्यांनी बनवलेल्या प्रकल्पांना भरभरून दाद दिली.
