मुंबई : लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली,
मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक गणेशगल्ली परिसरातून सकाळी निघाली. कारोना या महामारीचे सावट असले तरी या मिरवणुकीस भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतून विसर्जना करिता निघण्याचा पहिला मान हा गणेश गल्ली च्या मुंबईच्या राजाचा असतो आणि त्या नंतर इतर मंडळे गणेश विसर्जनाकरिता मार्गस्थ होतात. भाविकांचा जनसमुदाय हे हया विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असते.