दिव्यांगांच्या गिर्यारोहण कार्यक्रमातून किल्ले स्वच्छता मोहीमेला फिनिक्स फाउंडेशन (इंडिया) तर्फे सुरुवात

मुंबई : दिनांक १८-१९ डिसेंबर २०२१ ला राजगड कार्यक्रम आपण आयोजित केला होता. गेल्या आठवड्यात पाऊस पडून गेला. शिवाय ओमिक्रोन या रोगाची साथ पसरते आहे. या कारणामुळे रोटरी क्लब जहचे अध्यक्ष आशिष पाटणकर आणि फिनिक्स फाउंडेशनच्या समितीने तो कार्यक्रम पुढे करू असे सांगून मुंबई किल्ले स्वच्छता मोहीम आणि कोरोना जनजागृती हा कार्यक्रम मोजक्या दिव्यांग मित्रांसोबत करण्याचे ठरविले.
फिनिक्स फाउंडेशन (इंडिया) तर्फे दिव्यांगांच्या गिर्यारोहणाची सुरुवात२००१ पासून करण्यात आली. त्यानंतर दिव्यांगांची गिर्यारोहण संस्था म्हणून फिनिक्स फाउंडेशनची स्थापना २००८ रोजी केली. तेव्हा पासून २०२१ पर्यंत कळसूबाई शिखर, रामगड तोहगड, नाणेघाट, शिवनेरी, राजमाची दरवर्षी भीमाशंकर रायरेश्वर सागरगड गिरनार परिक्रमा, हरिहर कित्ता कलावंतीण दुर्ग असे अपंगांच्या ४ ते १७५ च्या ग्रुप ने कार्यक्रम यशस्वी केले आहेत. आज पर्यंत १९२० पेक्षा जास्त जणांनी त्याचा लाभ घेतला आहे. काही जण नेहमीच मोठ्या उत्साहाने ट्रेक साठी येत असतात
२०२०-२१ कोविड-१९ महामारी मुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. रोटरी क्लब जुहू, उमंगयांच्या माध्यमातून ऑनलाईन ऑल इंडिया टॅलेंट शो (४८) यशस्वी केला. या दरम्यान आपले समिती सदस्य विनोद रावत यांनी कळसुबाई शिखर (४६) हरिहर (८), ढाक बहिरी (३) कलावंतीण दुर्ग(४) ट्रेकिंग कार्यक्रमाचे नेतृत्व सरकारी नियमाचे पालन करून केले. बहुतांश मुंबईचे रहिवासी, परंतु बन्याच जणांना मुंबईचा इतिहास किंवा मुंबईतील किल्ले यांची माहिती नसावी मुंबईच्या किल्ल्यांची माहिती मिळावी म्हणून फिनिक्स फाउंडेशनच्या कार्यकारिणीने २०१४ साली Forgotten Fort In Mumbal Cleanup Drive असा कार्यक्रम केला होता. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com