मुंबई : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, सायन पश्चिम, धारावी, मुंबई- १७ यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रका नुसार ( संदर्भ:- मा. जिल्हाधिकारी यांचे पत्र. क्र. सीएसेलार/मशा/जिमखाना/जि.कि../ वि.मु.सु./ २०२१/१२६९४ दिनांक : १०/१०/२०२१) उपरोक्त संदर्भीय पत्राच्यानुषंगाने मुंबई शहर जिल्हातील विविध जिमखान्यांमध्ये उपलब्ध असलेल्या क्रीडा सुविधांचा वापर मुंबई शहर जिल्हातील राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय खेळाडुंना दैनंदिन सरावाकरीता विनामुल्य उपलब्ध करुन देणेबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत.
मुंबई शहरातील खेळ सराव करीत असलेले मुंबई शहर जिल्ह्यातील उत्कृष्ठ खेळाडु ज्यांनी राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग किंवा प्राविण्य मिळविले आहे अशा खेळाडूंची यादी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर येथे सादर करावी की जेणेकरून या खेळाडुंना जिमखान्यांमध्ये क्रीडा सुविधा विनामुल्य उपल्बध करुन देणार आहेत. त्या अनुषंगाने आपल्याकडील खेळाडूंची यादी २५ नोव्हें २०२१ पर्यंत कार्यालयात सादर करावी, अशी सदर पत्रका द्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी विनंती केली आहे