असंघटित कामगारांना मोफत ई-श्रम कार्ड

मुंबई : “गिरणगावातील कष्टकऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, श्रमजीवींना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी तसेच सरकारकडून राबविल्या जाणार्‍या विविध योजनांचा लाभ कष्टकऱ्यांना मिळावा यासाठी आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले आणि प्रकल्प सहाय्यक राजेंद्र खानविलकर यांनी राबविलेल्या मोफत असंघटित कामगार नोंदणी शिबिराचा लाभ विभागातील जनता घेत आहे आणि खर्‍या अर्थाने ह्या धडाडीच्या कार्यकर्त्यांना “आशीर्वाद” देत आहे” असे उद्गार माजी नगरसेवक तसेच कामगार नेते मनोज जामसुतकर यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा कामगार, अंगणवाडी सेविका, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, लेदर कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऑटो चालक, गवंडी, लोहार, सुरक्षाकर्मी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन इत्यादी काम करणारे श्रमजीवी, ज्यांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळावी. विमा योजनांचा लाभ मिळावा याकरता आशीर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले आणि प्रकल्प सहाय्यक राजेंद्र खानविलकर यांच्यासोबत तुषार पाटकर, सुभाष गोरेगावकर, अनिल कदम, इसरार खान, विलास इंगळे, रवी कदम, श्रीकृष्ण पावले, सुप्रित राणे, आनंद भोगळे, नवनाथ पाटील आणि ओमकार कदम यांनी अविरत मेहनत घेतली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com