
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील शांती दूध सेवा संघातर्फे या संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त अरुण तातू वाघमारे यांच्या पुढाकाराने धम्म वंदना त्याच प्रमाणे भवानी शंकर रोड दादर येथील जय भीम स्तूपाला मेणबत्ती आणि हार घालून भीम वंदना आणि प्रार्थना करण्यात आली यावेळी या विभागातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती या मंडळाचे व संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अमोल बडेकर अमित पवार .पराग जाधव. राजेश कांबळे. सुमित वाघमारे .सोनाबाई सावंत . हौसाबाई गायकवाड कल्पना तो रणे सुषमा उबाळे प्रियंका सोनावणे मंगल बनसोडे सुमेध भंडारे. रोहन वाघमारे. कुणाल धामणस्कर, श्रवण साबळे इत्यादी विभागातील मंडळी उपस्थित होती