मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला स्थगिती, तुर्तास बदलणार नाही औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे

मुंबई : महाराष्ट्राची सत्ता हाती घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याच्या उद्धव यांच्या निर्णयाला शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. वास्तविक, उद्धव ठाकरे यांनी गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नावही डी.बी.पाटील करण्याची घोषणा करण्यात आली.

दुसरीकडे दोन्ही शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घाईघाईने घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अशा स्थितीत सरकार त्यावर नव्याने विचार करून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे.

त्यावर राज्यपाल आणि फडणवीस यांनी घेतला होता आक्षेप
अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरे यांनी सरकार पडण्यापूर्वी 29 जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला पत्र लिहून म्हटले आहे की, सरकार अल्पमतात आहे, अशा वेळी लोकाभिमुख निर्णय घेता येत नाहीत. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला. सरकारने घाईघाईने हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. बहुमत चाचणीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला, तो चुकीचा होता.

एआयएमआयएमनेही घेतला होता आक्षेप
AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनीही औरंगाबादच्या नामांतरावर आक्षेप घेतला होता. या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. इम्तियाज जलील म्हणाले होते की, संपूर्ण जगात औरंगाबादची ऐतिहासिक ओळख आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com